vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

नेत्रदान पंधरवड्या निमित्त वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन

नेत्रदान पंधरवड्या निमित्त वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी जिल्हा रुग्णालय ,सातारा येथे नेत्रदान पंधरवड्या निमित्त वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय याशनी नागराजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले .या वॉकेथॉनची सुरुवात जिल्हा रुग्णालय ,सातारा येथून होऊन खालच्या रस्त्याने शेटे चौक व तिथून परत जिल्हा रुग्णालय सातारा येथे सांगता झाली . याप्रसंगी आयोजित उद्घाटन कार्यक्रमांमध्ये बोलताना याशनी नागराजन मॅडम यांनी सर्व उपस्थित लोकांचे कौतुक केले. तसेच जिल्हा रुग्णालयातील नेत्रदानासंबंधी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले .या वाकेथॉनमध्ये साधारण 350 सातारकरांनी आपला सहभाग नोंदवला . शहरातील अनेक डॉक्टर्स, सामाजिक संस्था, स्पोर्ट ग्रुप व इतर अनेक सातारकरांनी यामध्ये भाग घेतला. माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी नेत्रदान विषयी माहिती दिली व अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी पुढे यावे असे आवाहनही या निमित्ताने उपस्थितांना केले. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन व सूत्रसंचालन डॉक्टर सुजाता राजमाने यांनी केले. याप्रसंगी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत काटकर, डॉक्टर सुभाष कदम ,डॉक्टर प्रिया मेश्राम ,डॉक्टर अरुंधती कदम, डॉक्टर संजीवनी शिंदे ,डॉक्टर पूनम लाहोटी, नेत्र चिकित्सा अधिकारी श्री शिंदे ,श्री नायकवडी श्री कांबळे ,श्री पाटोळे, जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचाजन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta