
ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..
सांगली, प्रतिनिधी: परवानाधारक ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी शासन निर्णय दि. 16 मार्च 2024 नुसार ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. ही योजना परवानाधारक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांकडे अनुज्ञप्ती (लायसेन्स) व बॅज असणे आवश्यक आहे. परिवहन कार्यालयाकडडून नोंदणीकृत चालकांना ओळखपत्र जारी केले जाईल. या योजनेची नोंदणी/ओळखपत्र शुल्क रक्कम 500 रूपये वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये इतके आहे. अर्जासोबत नोंदणी शुल्क मंडळाच्या अधिकृत बँक खात्यामध्ये जमा करावे. कोणत्याही परिस्थितीत सदस्यत्व शुल्काची रक्कम रोख स्वरुपात अथवा क्युआर कोड द्वारे भरणा केला जाणार नाही याची दक्षता सदस्य नोंदणी करतेवेळी घ्यावी. योजनेच्या अधिक माहिती करीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्याशी संपर्क साधवा.



