vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबई प्रतिनिधी-भारत हा मोशन पिक्चर असोसिएशनसोबत भागीदारी वाढवून जागतिक स्तरावर सुरक्षित सर्जनशील उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले

मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या अर्थात वेव्हज् 2025 च्या तिसऱ्या दिवशी, मोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीए) भारताच्या चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल सादर केला. या अहवालाच्या प्रकाशन समारंभाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि एमपीएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन उपस्थित होते

. मुरुगन यांनी एमपीएच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर वाढता प्रभाव मान्य केला. “भारतीय कथा भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रभाव पाडू शकतात हे आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांनी सिद्ध केले आहे,” असे डॉ. मुरुगन म्हणाले. धोरणे, निर्मिती प्रोत्साहन आणि मजबूत बौद्धिक संपदा संरक्षणाद्वारे सर्जक-प्रथम परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिला. अलीकडील पायरसीविरोधी सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल युगात कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

चार्ल्स रिव्हकिन यांनी भारताच्या मनोरंजन उद्योगासाठी “महत्त्वपूर्ण क्षण” असलेल्या या काळात एमपीएच्या भारतासोबतच्या सातत्यपूर्ण भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. “भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे आणि या प्रवासाला पाठिंबा देणे एमपीएसाठी अभिमानास्पद आहे,” असे रिव्हकिन म्हणाले. भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी उद्योगांनी 26 लाख रोजगारांना आधार दिला आणि वार्षिक आर्थिक उत्पादनात 60 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवले.

संबंधित पोस्ट

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*