vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे- अनंत विष्णू..

सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे- अनंत विष्णू..

 

 

( सुरेश गायकवाड ) मुंबई- समाजातील दारूबंदीवर भर देऊन आरोग्य,शिक्षण या मुलभूत गरजा मोफत देण्यासाठी तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्यास समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र, सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 

     संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करून गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण, अधिकाधिक रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी सांगितले.

 

याशिवाय सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक

महिला व बाल विकास विभाग-भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी 40 रुपये मेहनताना मिळणार,1964 नंतर प्रथमच बदल

vishwatmaklokswamivarta