vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

राष्ट्रीय, सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

राष्ट्रीय, सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

 

 

सांगली, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली मार्फत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सांगली जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

 

या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलवर व सर्व तालुका क्रीडा संकुलवर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरती, आर्मी भरती सराव सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रम. 27 सप्टेंबर रोजी व्यायामशाळा, खुली व्यायामशाळा परिसर स्वच्छता उपक्रम, 28 सप्टेंबर रोजी विविध शाळांमधील जिमखाने स्वच्छता उपक्रम, 29 सप्टेंबर रोजी रस्ते वाहतूक नियमन मध्ये युवकांचा सहभाग, 30 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन तलाव परिसर स्वच्छता अभियान असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

000000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी उपसा जलसिंचन वीजदर सवलतीत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद- उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..