vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज -माजी राज्यमंत्रीअर्जून खोतकर

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज -माजी राज्यमंत्रीअर्जून खोतकर

 

राज्य प्रतिनिधी – देशाला आज क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या विचारांची खरी गरज आहे, तरुणांनी देशातील थोर स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आत्मसात केल्यास देशभक्ती निर्माण होण्यासाठी फार मोठी मदत होईल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.

क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची शनिवार रोजी जयंती दिनानिमित्त सिगलीकर समाज यांच्या वतीने छ. संभाजी उद्यान (मोतीबाग)येथील आयोजित कार्यक्रमात श्री.खोतकर हे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणालेकी, देशाच्या क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास सर्व दूर पोहचवण्यासाठी सामजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतीमेस श्री. खोतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . कार्यक्रमाच्या प्रस्ताविक संदीप सिंग भादा यांनी करतांना सागितले कि,जालना जिल्ह्यामध्ये शहीद भगतसिंग यांचे स्मारक नाही त्यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा याप्रसंगी न.प गट नेते गणेश राऊत, पंडित भुतेकर, बंडू मोहिते, शिवप्रसाद चित्तोळकर, अँड अशपाक पठाण, सिगलिकर समजाचे अध्यक्ष संतोष सिंग कलानी, सय्यद जावेद अली, बाबासाहेब सोनवणे, सतनाम सिंग टाक, गुर्मीत सिंग सेना, अजित सिंग कलानी, गुर्मीत सिंग कलानी, करण सिंग भोंड, तारण सिंग कलानी, जित्तू सिंग टाक, गोपी सिंग कलानी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सिंग कलानी यांनी केले.

संबंधित पोस्ट

राज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ – ज्योतीरादित्य शिंदे…

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्रस्ताव बँकांनी प्राधान्याने निकाली काढावेत– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीजिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंड येथील: रिसॉर्टमधील पाहुण्यांसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; पीडितेच्या फेसबुक मित्राने केला मोठा खुलासा, आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta