vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार

कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार

 

          प्रदेश प्रतिनिधी  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी निर्बंध शिथील करून मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

एक विशेष बाब म्हणून ही मान्यता देण्यात येत असून, पन्नास टक्के पदे ही त्याच विद्यापीठांच्या बाधित प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव ठेवण्यात येतील. चारही कृषी विद्यापीठांत तीन हजार 232 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून, यामुळे बाधित झालेल्या कुंटुंबातील पात्र उमेदवाराची यात भरती करण्यात येईल. ही विशेष भरती प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेचा निर्णय, समांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण याची सांगड घालण्यात येईल.

—–०—–

संबंधित पोस्ट

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

मुंबई महानरपालिकेच्या जी.उत्तर विभागातील सनाउल्ला कंपाऊंड  येथील सुका कचरा वर्गीकरण केंद्रावर दिवाबत्तीची सोय झाल्यानंतर सर्व कचरावेचक संस्थाचालक यांनी मानले प्रशासनाचे आभार.