vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही-अर्जुनराव खोतकर..

वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही-अर्जुनराव खोतकर…

 

राज्य प्रतिनिधी जालना : शिवसेना हा पक्ष नेहमीच वंजारी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून भविष्यातही राहील, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळेच आपण देखील वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना दिली.

जुना जालना भागातील भगवान सेवा मंडळाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात श्री. खोतकर बोलत होते. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मेघराज चौधरी यांची विशेष उपस्थित होती. तर या कार्यक्रमासाठी अशोकराव आघाव, गतत घुगे, मुरलीधर काकड, राजेंद्र राख, डॉ. चौरे, भगवान सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीमंतराव मिसाळ, गजानन गिते, विजयकुमार वाघ, मधुराज डोईफोडे, महादेव आघाव, के. पी. विघ्ने, विलास जायभाये, बंडु इघारे, उध्दवराव जायभाये, बाबासाहेब गिते, शेषराव वाघ, ओमप्रभू नागरे, दिपक दराडे, भगवानराव गिते, संदीप घुले, ब्रम्हा वाघ, काळुसे सर, सुखदेव नागरे, अ‍ॅड. मधुकरराव सोनुने, इंजि. हुसे, कैलास हजारे, गणेश घुगे, अ‍ॅड. राजेश वाघ, पालवे, प्रकाश जायभाये, योगेश घुगे, वाघ, मयुर भताने, शिवाजी वाघ आदींची उपस्थिती होती.

वंजारी समाज भवनासाठी जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने बोलतांना श्री. खोतकर पुढे म्हणाले की, वंजारी समाजासाठी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ व्हावे, अशी मागणी नुकतीच जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी माझ्याकडे केली होती. याची दखल घेऊन आपण समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली व मुख्यमंत्री महोदयांनी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जालना येथे खा. श्रीकांत शिंदे आले असता भाऊसाहेब घुगे यांच्या विनंतीवरुन वंजारी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची बैठक घडवून आणली. समाजाच्या महामंडळासह विविध मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. समाज भवनासाठी भाऊसाहेब घुगे यांच्या मागणीनुसार पहिल्यांदा पन्नास लक्ष रुपयांचा आणि नंतर ऐंशी लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, वंजारी समाजासाठी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

वंजारी समाजासाठी महामंडळ व्हावे, याकरीता मी आपल्याकडे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व महामंडळ स्थापन होईपर्यंत समाजबांधवांना सोबत घेऊन पाठपुरावा करणार आहेह. जालना शहरामध्ये समाज बांधवांकरिता, गोरगरीबांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी एक सुसज्ज वस्तीगृह व्हावे, या करीता एक कोटीचा निधी मंजूर करावा, अशी मागणीही श्री. घुगे यांनी श्री. खोतकर यांच्याकडे केली व ती मंजूर करुन आणावी लागेल, तेवढा निधी देण्याचे आश्वासन श्री. खोतकर यांनी दिले.

यावेळी भगवान सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीमंतराव मिसाळ, अध्यक्ष राजेंद्र राख यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. जगत घुगे यांनी केले. यां कार्यक्रमास शिवसैनिकांसह वंजारी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

—————————————————————————————————अर्जुनराव खोतकर हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते श्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या भगवान सेवा मंडळ, वंजारी समाज सभामंडप बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते श्री. अर्जुनराव खोतकर म्हणाले की, कुठल्याही विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे करण्यात यावीत याकडे संबंधितांचे लक्ष वेधून ते म्हणाले की, उगीच करायची म्हणून कामे करु नका. निधी देणे आमच्या हातात असले तरी शेवटी काम हे गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे. त्यातच खरी मजा आहे, असेही श्री. खोतकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संपर्क प्रमुख श्री पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख श्री भाऊसाहेब घुगे, युवा सेनेचे सचिव श्री अभिमन्यू खोतकर, शहर प्रमुख श्री विष्णू पाचफुले, श्री आत्मानंद भक्त, मनपा आयुक्त श्री संतोष खांडेकर, मनपाचे अभियंता श्री सय्यद सउद, भगवान सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र राख, डॉ. श्रीमंतराव मिसाळ, अ‍ॅड. मधुकर सोनवणे, श्री विजयकुमार वाघ,श्री पी. के. विघ्ने व वंजारी समाज बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो

संबंधित पोस्ट

व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन.

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

CBI करणार मणिपूर हिंसाचाराची चौकशी; अमित शाह म्हणाले…

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta