vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उमेदवारांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशन प्रक्रियेचे प्रशिक्षण

उमेदवारांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशन प्रक्रियेचे प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशन प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी यावेळी उपस्थित राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशनाबाबत माहिती दिली. नामनिर्देशन प्रक्रियेवेळी आवश्यक दाखले व कागदपत्रे, विविध प्रतिज्ञापत्रे, त्यांचे नमुने, नामनिर्देशन अर्ज भरतांना घ्यावयाची खबरदारी, प्रस्तावकांचे निकष, उमेदवारीचे निकष, राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी द्यावयाचे विविध प्रमाणपत्रे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच अनामत रक्कम, ऑनलाईन सुविधा इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले. नामनिर्देशन पत्र भरतांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक सुविधा कक्ष असून त्या कक्षातही ही माहिती व माहिती पुस्तिका आदीबाबत माहिती उपलब्ध असेल असेही स्पष्ट करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरतांना बॅंक खाते, मतदार यादीतील नाव व उमेदवार मतदार संघाबाहेरील मतदार असल्यास तेथील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. प्रस्तावक मात्र मतदारसंघातील असणे आवश्यक आहेत, अशा विविध पैलूंवर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच संभाव्य उमेदवारांचे प्रतिनिधी या प्रशिक्षणात सहभागी झाले.

 

०००००

संबंधित पोस्ट

राजकारणात येणार असलो तरी स्वराज्याला तत्वांची बैठक असेल, छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी प्रकल्पांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.

जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा