मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विधानसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात सुव्यवस्थित पार पडावी व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाच्या अगोदरच्या आधीचा दिवस दि.१८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून पुढे, मतदानाच्या आधीचा दिवस दि.१९ नोव्हेंबर संपूर्ण दिवस व मतदानाचा दिवस दि.२० नोव्हेंबर संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा संपर्ण दिवस दि.२३ नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस घोषीत करुन मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील,असे कळविण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्या