vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज आकाशवाणीवर-रेडिओ एफ.एम ९०.८ वर मुलाखत..

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज आकाशवाणीवर-रेडिओ एफ.एम ९०.८ वर मुलाखत..

 

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर,  विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांना माहिती देण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि.९ रोजी सकाळी साडे अकरा वा. आकाशवाणीच्या एफ. एम. १०१.७ या वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे वृत्तसंपादक समरजीत ठाकूर यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत जिल्ह्यातील प्रशासनाचे विधानसभा निवडणूकीसाठीचे नियोजन, निर्भय निष्पक्ष निवडणूकीसाठी केलेल्या उपाययोजना तसेच मतदार जनजागृतीसाठीचे आवाहन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

रेडिओ एफ.एम ९०.८ वर- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांना माहिती देण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत एमजीएम एफ एम ९०.८ वर शनिवार दि.९ रोजी सकाळी ९,दुपारी ३ वाजता व सायंकाळी ६ वा प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज जिल्ह्यात विधानसभा निवडणूक विषयक प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सुनिल शिरसीकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे१००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

बॉम्बे हायकोर्ट चे नाव महाराष्ट्र हायकोर्ट  करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं!

vishwatmaklokswamivarta

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन