vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिव्यांगासह इतर तरुण तरुणीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

दिव्यांगासह इतर तरुण तरुणीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 ( सुरेश गायकवाड ) राज्य प्रतिनिधी मुंबई- समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्डतर्फे रामनिरंजन झुनझुनवाला कला महाविद्यालयात 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3 .00 वा. सायन्स अँड कॉर्मस स्टेशन रोड घाटकोपर रेल्वे स्टेशन समोर घाटकोपर पश्चिम मुंबई- ४०००८६ येथे दिव्यांगासह इतर तरुण – तरुणीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे या संस्थेचे समन्वयक जितेंद्र कर्णिक यांनी आयोजित केलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत सांगितले . त्यावेळेस त्यांचे सहकारी ऋषिकेश पवार , तेजल हांडे उपस्थित होते .

  त्यावेळेस त्यांनी सांगितले की , १९९७ रोजी समर्थनाम ट्रस्ट फॉर द डिसेबल या संस्थेची स्थापना झाली . तेंव्हापासून या संस्थेने दिव्यांगासाठी दर्जदार शिक्षण, निवास , पौष्टिक आहार , व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट आधारीत पुनर्वसन प्रदान करण्यावर भर देऊन विविध उपक्रमांद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी कार्य करण्यावर भर दिला आहे .

या संस्थेने कर्नाटक, दिल्ली / एनसीआर , तेलंगणा, तामिळनाडू , आंध्रप्रदेश , महाराष्ट्र , मध्यप्रदेश आदी अनेक शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगून सन 2030 पर्यंत 1 लाख दिव्यांग आणि गरजू, वंचित आदी तरुण तरुणीसाठी काम करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला . या रोजगार मेळाव्यात कमीत कमी 10 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता असलेल्यांना त्याचा लाभ घेता येईल असेही त्यांनी सांगितले   एवढेच नव्हें तर या संस्थेचे मुख्यालय बंगलोर येथे असून ‘ नेरूळ , नवी मुंबई व वाघोली पुणे याठिकाणी 3 महिने निवासी प्रशिक्षण देण्यात येते . त्यावेळी त्या प्रशिक्षणार्थीना मोफत जेवणाची ही व्यवस्था केली जाते. अर्थात त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला जातो असे त्यांनी सांगितले .

संबंधित पोस्ट

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा..

vishwatmaklokswamivarta

जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशनसाठी सिडकोला टेंडर प्रक्रियेचे आदेश- उद्योग मंत्री उदय सामंत

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

पुरोगामी बुलंद नेतृत्व एन डी पाटील यांच्या निधनाने सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणारा झुंजार नेता हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta