vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महायुती सरकारनं तरुण उच्च शिक्षित पात्र उमेदवार दिला आहे यांना सर्वांनी मजबूत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करतो. जेणेकरून त्यांना विधानसभेत पाठवू शकू आणि इथल्या विकासकामांना देखील वेग पकडण्यास मदत मिळेल. मी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी कटिबद्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्राला आकार देण्याचं काम करत आहे. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

महायुती सरकारनं तरुण उच्च शिक्षित पात्र उमेदवार दिला आहे. राजेश विटेकर यांना सर्वांनी मजबूत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करतो. जेणेकरून त्यांना विधानसभेत पाठवू शकू आणि इथल्या विकासकामांना देखील वेग पकडण्यास मदत मिळेल. मी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी कटिबद्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्राला आकार देण्याचं काम करत आहे. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

 

राज्य प्रतिनिधी-:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी श्री. दादासाहेब टेंगसे, श्री. बाळासाहेब राणे व अन्य मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महायुती सरकारनं तरुण आणि उच्च शिक्षित असा पात्र उमेदवार या मतदारसंघासाठी दिला आहे. श्री. राजेश विटेकर यांना सर्वांनी मजबूत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करतो. जेणेकरून आपण त्यांना विधानसभेत पाठवू शकू आणि इथल्या विकासकामांना देखील वेग पकडण्यास मदत मिळेल. मी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी कटिबद्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्राला आकार देण्याचं काम करत आहे.

निवडणूक तिकिटांचे वितरण करताना मी सामाजिक सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित केलं. १० टक्के जागा अल्पसंख्याकांना, १२.५ टक्के जागा ​​अनुसूचित जातींना, १२.५ टक्के जागा ​​आदिवासींना आणि १० टक्के जागा महिलांना दिल्या. विशिष्ट स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी ५० मतदारसंघांसाठी ५० जाहीरनामे तयार केले.

प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही सतत काम करत आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर अतिशय प्रभावी ठरली. माझ्या शेतकरी बांधवांना वीज बिल माफी दिली. परभणी जिल्ह्याला अजूनही लक्षणीय विकासाची गरज आहे आणि आम्ही ते घडवून आणण्यास तयार आहोत. उपसा सिंचन योजनेद्वारे ५४ गावं सिंचनाखाली आणण्याचं आमचं ध्येय आहे. राजेश विटेकर यांना पाठिंबा दिल्यास या भागाच्या विकासासाठी आपण ४ हजार कोटींची तरतूद करू, हा माझा शब्द आहे.

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे   – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील 8 मतदारसंघात एकूण 195 उमेदवारांची 249 नामनिर्देशन पत्रे दाखल अखेरच्या दिवशी 118 उमेदवारांची 126 नामनिर्देशन पत्रे दाखल

vishwatmaklokswamivarta