vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

18 डिसेंबर शासकीय स्तरावर अलपसंख्याक दिन साजरा करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे.

18 डिसेंबर शासकीय स्तरावर अलपसंख्याक दिन साजरा करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे.

 

औरंगाबाद (प्रतिनिधी )आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागातर्फे 18 डिसेंबर संख्या दिवस साजरा करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग व राज्य अल्पसंख्या आयोगाकडून दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्याबाबतचे शासनाचे परिपत्रक दर वर्षी जाहीर होते.

अल्पसंख्यांक हक्क दिन यावर्षी देखील मोठ्‌या उत्साहाने व योग्य पद्धतीने शासकीय पातळीवर साजरा व्हावा, तो केवळ फोर्स ठरू नये, आपल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात मुस्लिम, जैन. खिश्चैन, सिख, नवबौध्द या अल्पसंख्यांक समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्या संविधानिक व अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने राज्य व केंद्र सरकारला दिलेली आहे. संभाजी अल्पसंख्यांक दिन विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात विविध पद्धतीने साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करण्यास तयार आहोत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग समिती यांच्याकडे निवेदना‌द्वारे मागणी ,

 राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे मागणी केलेली आहे. खालील प्रमाणे आमच्या मागण्याचा आपण गंभीरपणे विचार करावा.1) जिल्हा अल्पसंख्यांक विकास संनियंत्रण समितीची तातडीची बैठक बोलावून अल्पसंख्यांक दिन साजरा करणेबाबत नियोजन करावे.2) शासकीय स्तरावर अल्पसंख्यांक दिन हा जिल्हा व तालुका पातळीवर बुधवार दि. 18 डिसेंबर 2024 रोजीच उत्साहाने साजरा करावा.3) जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक दिन साजरा करताना तो जिल्हाधिकारी कार्यालयात D.P.D.C. हॉल मध्ये किंवा मध्यवर्ती ठिकाणी आणि सर्वसोयीने युक्त असलेल्या ठिकाणी साजरा करण्यात यावा, जेणेकरून सर्व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय लोकप्रतिनिधी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल. आपणही आपल्या कार्यालयामार्फत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करावे.अल्पसंख्यांक हक्क दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा होण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी आपल्या कार्यालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षण विभाग यांना योग्य ते निर्देश द्‌यावेत. शाळा, महावि‌द्यालयामध्ये तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अल्पसंख्यांक दिन साजरा करताना अल्पसंख्यांकांच्या संविधानिक हक्क व अधिकाराबाबत तज्ञ व्यक्तींकडून योग्य ते प्रबोधन व्हावे.4) अल्पसंख्यांक समाजाला त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क व अधिकार याची माहिती होण्यासाठी तसेच अल्पसंख्यांक योजनांची माहिती होण्यासाठी भेळाने, चर्चासत्र आयोजित करून डिजिटल बॅनर द्वारा तसेच विविध प्रसार माध्यमांद्वारे त्यास जाहीर प्रसिद्धी द्यावी.5) अल्पसंख्याक हक्क दीन दि. 18 डिसेंबर 2:24 रोजी आपल्या कार्यालयाकडून योग्य पद्धतीने साजरा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची आपण गंभीरपणे नोंद. घ्यावी.6) अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिन प्रभावीपणे साजरा होऊन याबाबतचा अहवाल अल्पसंख्याक आयोगाकडे व अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सादर करणेत यावा.आमच्या निवेदनानुसार तातडीने याबाबत कारवाई व्हावी ही नम्र विनंती, या कामाबाबत आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो, धन्यवादश्री. अभिजीत भय्या देशमुख, शहर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,रफीक आईजी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रा.कॉ.गौस पठाण, शहर जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी. अल्पसंख्यांक विभाग, छ. संभाजीनगर (औरंगाबाद).अनुराग शिंदे,शेख मुजीब पटेल, प्रदेश सचिव, रा.कॉ.पा,जैनीस अहेमद, मेरो, रा.कॉ.पा.,सय्यद मोहसीन, प्रदेश सचिव, रा.कॉ.पा.शेख अन्वर अली शेर खान,शरिक खान, शेख जावेद, आझम खान, बिपिन वाघमारे,शेख अन्तर,शे-कैसर, नितीन गायकवाड,पंकज अंभोरे,रजा शेख,आमेर खान,शेक जावेद महमुद, उपाध्यक्ष,आदींचे स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित पोस्ट

बाईक रॅलीव्दारे सांगलीत मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;चौकशी करून कारवाई होणार- मंत्री उदय सामंत

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत