vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

 

    *रायगड-अलिबाग, प्रतिनिधी

* जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.     महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब असाधारण क्र.317 दि.9 सप्टेंबर 2025 मधील ग्राम विकास विभागाची अधिसूचना क्र.जिपनि-2025/प्र.क्र.12ज/पंरा-2, दि.9 सप्टेंबर 2025 नुसार रायगड जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील 15 पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षाच्या कालावधीकरिता खालील प्रवर्गाप्रमाणे निश्चित करुन देण्यात आले आहे.

   अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 0 आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे.

    अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे. अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे.

   नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 2 आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 2 आहे.

   सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 4 आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 4 आहे.

    तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे दि.9 सप्टेंबर 2025 च्या शासन अधिसूचनेप्रमाणे 15 पंचायत समित्यांचे सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार, दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता विशेष सभा अयोजित करण्यात आली आहे.

    तरी रायगड जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या आरक्षण सोडत सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू,महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध  — वनमंत्री गणेश नाईक

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी