मोबाईल पेक्षा ग्रंथ वाचनास प्राधान्य द्या : उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर शांतिनिकेतन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा…
जालना, (प्रतिनिधी)-मोबाईलचा वापर हा अपरिहार्य झाला असला तरी अतिवापरामुळे बुद्धी, क्षमतेवर परिणाम होतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरावर स्वतःच बंधने घालावीत, मोबाईलचा कमीत कमी वापर करून चांगले ग्रंथ वाचावेत असा सल्ला उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी आज दिला.शहरातील संभाजीनगर परिसरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन गुरूवारी १२ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी हारकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी विविध क्षेत्र व परिक्षेतील
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.समर्थ शिक्षण
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर, माजी नगरसेवक अय्युब पठाण,गणेश घुगे,महेंद्र अकोले, पांडुरंग काळे, संस्थेचे संचालक प्रा.राम कदम,नंदकुमार जाधव, अश्विन अंबेकर यांच्यासाह रविकांत जगधने यांची याप्रसंगीप्रमुख उपस्थिती होती.उपविभागीय अधिकारी डॉ.हारकर पुढे म्हणाले की, गुणवत्ता, शिस्त आणिविद्यार्थ्यांप्रती खरी तळमळ यांचे प्रतिबिंब शांतिनिकेतन मध्ये दिसतअसून संस्थेची रयत शिक्षण संस्थेप्रमाणे भरभराट व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ग्रीन एनर्जी व शुध्द पिण्याच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाचे आशीष रसाळ यांनी केले. यावेळी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावरील क्रीडा, कला, वाद- विवाद,स्वच्छता मॉनिटर, अशा विविध स्पर्धांमधील विजेते, आय.आय.टी., आय.आय.एम,मेडिकल अशा विवीध विद्या शाखांमध्ये प्रवेश प्राप्त विद्यार्थी, पालक,तसेच शिक्षक वृंदांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनीप्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थितीहोती.प्रशासनाचे सहकार्य आणि लोकाश्रय हवा : भास्कर अंबेकरजालना शहरात चांगले शिक्षण देणार्या काही शाळा आहेत ज्यांना राजश्रयअथवा धनाढ्य दानशूरांचा पाठिंबा नाही, तरीही शिक्षक वृंद प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. अशा शाळांचा सर्वे करून प्रशासन आणि दानशूरांनी त्यांना पाठबळ दिले पाहिजे. यावेळी संस्थेची अत्यंत सामान्य स्तरातील व खेड्यापाड्यातून येऊन शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनागुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची तळमळ त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तरसंस्थेने स्वखर्चातून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. असे नमूद करत विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे महत्त्व ओळखून पालकांची स्वप्ने साकारकरावीत. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी केले.
०७ ते ८- जालन्यातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाचेउद्घाटन व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाप्रसंगी उपविभागीयअधिकारी हारकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह मान्यवर.