vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.२० डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी

युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे – वीरमाता अनुराधा गोरे, फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या ‘मीडिया ॲवार्ड-२०२४’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सुरू होणार लोकल रेल्वे,घे लस आणि लोकलमध्ये बस, सर्वसामांन्याना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेचं स्वातंत्र्य..