vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.२० डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना प्राधान्य…? राहुल गांधी यांच्या नकारानंतर चर्चा

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय… केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री पियुष गोयल

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,कल्याण सिंग यांची प्रकृती चिंताजनक; योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांनाही ओळखू शकले नाहीत.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राटडॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

vishwatmaklokswamivarta

राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार- क्रीडा मंत्री संजय बनसोडे..

vishwatmaklokswamivarta