vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध – गौतमभाऊ सोनवणे

गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध – गौतमभाऊ सोनवणे

 

( सुरेश गायकवाड )-मुंबई- रिपब्लिकन पक्ष सर्व सामान्य जनतेचा आधारवड आहे. तो तरुणांचा प्रेरणास्थान आहे. दिनदुबळ्यांचा तारणहार आहे. सर्व जातीधर्मपंथाचा वाली आहे. त्यामुळे या पक्षात तरुणांनी सहभागी होऊन त्याची धुरा वाहण्याची गरज आहे. त्यामुळेच गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबध्द असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी मुंबईच्या कॉटन ग्रीन येथील अंधांना चादर, पाणी वाटप करण्यात आले असताना त्यांनी सांगितले . हा कार्यक्रम दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते, केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला त्यावेळेस ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून त्यांच्या विचारावर वाटचाल करणारा एकमेव पक्ष आहे. या पक्षाच्या अशा वाटचालीने तो अधिक मजबूत झाला आहे.

 यावेळेस महापरिनिर्वाण समन्वय समितीचे नागसेन कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हा निरिक्षक चंद्रकांत पाटील, पर्यावरण रक्षणाचे अध्यक्ष विजय शेट्टी, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड , पंकज माघाडे, विनोद पवार, श्रीकांत जाधव, प्रकाश साळवे, व्यवस्थापक केशव वाके, तसेच रिपाई (आठवले ) गटाच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख दादासाहेब जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यालयाचे आयोजन सरचिटणीस शिरिषभाई चिखलकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

ध्वजदिन निधीसाठी रुपये 5 लाख मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https:indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत,

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

मुंबई महानगरपालिकेच्या जी.उत्तर विभागाच्या सीमेवरील 5 किलोमिटर लांबीचा समुदरकिनारा आजमितीला मायक्रोलेवल काचाराशुन्य दिसत असून याचे संपूर्ण श्रेय जाते सहाय्यक आयुक्त श्री.प्रशांत सकपाले  यांना..

vishwatmaklokswamivarta