घाटकोपर चिराग नगर परिसरात अपघात,, भरधाव टेम्पो न अनेकांना चिरडले
मुंबई प्रतिनिधी-
आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर , मुंबई. येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात. वय 25 वर्ष, धंदा चालक याचा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणारे पादचाऱ्यांना टेम्पो ची धडक लागली.
प्राप्त माहितीनुसार
काल रोजी 18:30 वाजताच्या दरम्यान आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर , मुंबई. येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात. वय 25 वर्ष, धंदा चालक याचा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणारे पादचाऱ्यांना टेम्पो ची धडक लागली.
सदर अपघातामध्ये महिला नामे प्रीती रितेश पटेल वय 35 वर्ष राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम मुंबई ही मयत झाली आहे.
तसेच इतर तीन महिला व एक पुरुष जखमी नामे 1)रेश्मा शेख वय 23 वर्ष, 2)मारूफा शेख वय 27 वर्ष, 3)तोफा उजहर शेख वय 38 वर्षे 4)मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय 28 वर्षे सर्व जण राहणार – चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट , घाटकोपर पश्चिम मुंबई यांना मुके मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालय येथे उपचारा करीता दाखल केले आहे. टेम्पो चालक व टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.