vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन

रायगड प्रतिनिधी:- मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ बिल्डिंग, दूसरा माळा, मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे दिनांक 30 जून,2025 रोजी, दुपारी ठीक 04.00 वाजता 131 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

     यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्या टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.

   तसेच या तक्रारीत सविस्तर माहिती ज्या दिनांकाला अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्‍छूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई-400001 यांचेकडे दिनांक 20 जून,2025 पर्यंत पोहचेल अश्या बेताने पाठवावी. असे आवाहन श्री. सुनील थळकर, अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न 

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती..

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…