vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध – गौतमभाऊ सोनवणे

गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध – गौतमभाऊ सोनवणे

 

( सुरेश गायकवाड )-मुंबई- रिपब्लिकन पक्ष सर्व सामान्य जनतेचा आधारवड आहे. तो तरुणांचा प्रेरणास्थान आहे. दिनदुबळ्यांचा तारणहार आहे. सर्व जातीधर्मपंथाचा वाली आहे. त्यामुळे या पक्षात तरुणांनी सहभागी होऊन त्याची धुरा वाहण्याची गरज आहे. त्यामुळेच गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबध्द असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी मुंबईच्या कॉटन ग्रीन येथील अंधांना चादर, पाणी वाटप करण्यात आले असताना त्यांनी सांगितले . हा कार्यक्रम दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते, केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला त्यावेळेस ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून त्यांच्या विचारावर वाटचाल करणारा एकमेव पक्ष आहे. या पक्षाच्या अशा वाटचालीने तो अधिक मजबूत झाला आहे.

 यावेळेस महापरिनिर्वाण समन्वय समितीचे नागसेन कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हा निरिक्षक चंद्रकांत पाटील, पर्यावरण रक्षणाचे अध्यक्ष विजय शेट्टी, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड , पंकज माघाडे, विनोद पवार, श्रीकांत जाधव, प्रकाश साळवे, व्यवस्थापक केशव वाके, तसेच रिपाई (आठवले ) गटाच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख दादासाहेब जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यालयाचे आयोजन सरचिटणीस शिरिषभाई चिखलकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

बॉम्बे ट्रस्टच्या जुमा मशीद कडून लाऊड स्पीकर बंदी वर तोडगा; अ‍ॅप द्वारा आता लाइव्ह अजान, नमाज पाहता येणार..

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त स्वखर्चातून रस्ते तयार केल्याने शेतकऱ्यांनी मानले सतीश घाटगेंचे आभार….

vishwatmaklokswamivarta

वडाळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर नवी मुंबईत बलात्कार; आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta