vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबई: प्रतिनिधी -कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषिमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, उपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव अंबादास चंदनशिवे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

हॉटेल्सचालक, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण ग्राहक देवतेचा ‘नैवेद्य’ भेसळमुक्त असावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2025: मुख्य तारखा आणि तपशील हॉल तिकीट जाहीर…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta