vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. बाह्य यंत्रणेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यातील आरोग्य संस्थांनी तपासण्यांसाठी बाह्य संस्थांवर अवलंबून न राहता ‘इन-हाउस’ चाचण्या वाढवून स्वयंपूर्ण व्हावे. अनावश्यक तपासण्या टाळाव्यात तसेच बाह्य संस्थांकडून होणाऱ्या तपासण्यांच्या गुणवत्तेची नियमित पडताळणी करावी. रुग्णांना वेळेत तपासणी अहवाल मिळणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी आरोग्य उपसंचालकांनी सुस्पष्ट धोरणात्मक आराखडा तयार करावा अशा सूचना देण्यात आल्या. गावपातळीवर हृदयविकाराशी संबंधित प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यावरही भर देण्यात यावा. या योजनेचा प्रचार-प्रसार वाढवून अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा, यासाठी दरमहा आढावा घेण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले‌.

ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी ईसंजीवनी टेलीकंसल्टेशन सेवा अधिक प्रभावीपणे राबवून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात यावा. याशिवाय रुग्णालयांमधील यांत्रिक वस्त्र धुलाई सर्व आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये कार्यान्वित करावी तसेच स्वच्छतेसंदर्भातील अडचणी व सूचना बाह्य संस्थांनी प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपसंचालक दूरदृष्ये प्रणालीद्वारे उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीची बैठक

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta