vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खंडोबा देवाची यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतूक मार्गात बदल*

खंडोबा देवाची यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतूक मार्गात बदल*

सातारा प्रतिनिधी: मोजे पाल ता. कराड येथे 9 ते 16 जानेवारी या कालावधीत श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी राज्यातून व शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. यामुळे पोलीस अधीक्षक, समीर शेख महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१) (ब) नुसार पाल परिसरातील वाहतूकीच्या मार्गात 9 जानेवारी मध्यरात्रीपासून १६ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बदलाबाबत पुढीलप्रमाणे आदेश जारी केला आहे.

काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने पाल गावाच्या कमानी गावाजवळील तात्पुरते एस टी स्टॅन्ड समोर थांबवावित त्याच्यासमोरील शेतात केलेल्या पार्कींग व्यवस्थेनुसार तेथे वाहने पार्क करावीत. हरपळवाडी ते पाल येणारी सर्व वाहने ईमरसन कंपनीजवळ थांबवावीत व तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळेहून पालकडे येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला असलेल्या पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावित व तेथे पार्क करावीत. मरळी ते पालकडे येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर असलेल्या श्रीकांत शेजवळ यांचे शेतासमोर थांबवावीत व त्यांचे शेतात केलेल्या पाकींगमध्ये पार्क करावीत.

काशिळकडुन तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा- इमरसन कंपनी सासपडे मार्ग तारळेकडे जातील. तारळेकडून काशिळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथुन कोजावडे फाटा सासपडे मार्गे खोडद फाट्यावरुन कराडकडे जातील. कराड तसेच पाल भागातुन तारळे भागात जाण्याकरिता खोडद येथील फाट्यावरुन इमरसन कंपनी शेजारुन सासपडेमार्गे तारळेकडे जातील.

 वडगांव ते पाल हा सगळा रस्ता आपतकालीन रस्ता असून त्या रस्त्यावर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करणेस बंदी आहे. दि. ९ जानेवारीच्या रात्री २२.०० वाजलेपासून १६ जानेवारी रोजीच्या रात्री 10 वाजेपर्यंत वडगाव ते इंदोली फाटा जाणारे रस्त्याशेजारील जागेवर वाहनांना पाकींग करीता बंदी घालणेत येत आहे. 9 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत पाल गावात येणा-या सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे. पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना 10 जानेवारी रोजी दुपारी 3 पासून 12 जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. दि. 15 जानेवारी (पाकळणी दिवशी) रोजीचे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे.

  वरील वाहतूकीच्या मार्गाचे उल्लंघन केल्यास कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.000

संबंधित पोस्ट

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव; जिजाऊ गाथा महोत्सवाचे थाटात उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले