vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

            सांगली, प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन 2024 या वर्षामध्ये कृषि आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषि  पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीयशेती) पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. विविध कृषि पुरस्कार प्रस्ताव तयार करण्याकामी अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय..

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचेकडून शिवणी आरमाळ येथील कै. कैलास नागरे कुटुंबाचे सांत्वन ..

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…