vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी: मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महिलांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार करून पूरग्रस्त महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर पाच लाख सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सक्षम फाउंडेशनतर्फे आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड पूरबाधित महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या, पूरामुळे अनेक कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले आहे. शासनामार्फत अन्न, वस्त्र व आर्थिक साहाय्य दिले जात असले तरी महिलांच्या आरोग्याशी निगडित सॅनिटरी नॅपकीनसारख्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यातील पूरग्रस्तभागातील आठ ते नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनाच्या राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर सामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन पूरग्रस्त भागात मदतीचा हात द्यावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच या महिलांसाठी आधारदायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

नीट’ परीक्षा सुरळीत…

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील बदली व सेवा-वाढ नियमांचा भंग- चौकशीची मागणी

vishwatmaklokswamivarta

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta