vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कलागुणदर्शन स्पर्धांतील विजेत्या महिला व सेवाभावी संस्था सन्मान..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कलागुणदर्शन स्पर्धांतील विजेत्या महिला व सेवाभावी संस्था सन्मान..

नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी काम केले जात असून नवी मुंबई ही महिलांना प्रोत्साहित करणारी अग्रणी महानगरपालिका असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी व्यक्त केले. विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित विशेष समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवनचरित्र आपल्याला प्रेरणा देणारे असून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्यांचा वारसा जपत आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर दिसतात. त्यामुळे आजचा जयंतीदिन हा सर्वच दृष्टीने महत्वाचा असून नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने हा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे, नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, श्री. दिलीप नेरकर, श्रीम. संघरत्ना खिल्लारे, श्रीम.नयना ससाणे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्रीम.अभिलाषा म्हात्रे, माजी नगरसेविका श्रीम.कमलताई पाटील, श्रीम.उषा भोईर, श्रीम. सुवर्णा पाटील, श्रीम.सायली शिंदे, श्रीम.लता मढवी, श्री.बाळकृष्ण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी महिला व बालविकास क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने करीत असलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुकोद्गार काढले. सावित्रीबाईंनी संघर्ष करीत जिद्दीने स्विकारलेला शिक्षणाचा वसा सोडला नाही व शिक्षणातूनच प्रगती होते हे जाणून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यामुळेच आज सर्वच क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिध्द केलेले दिसून येते असे त्या म्हणाल्या.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राला उजाळा देत स्वत: शिक्षित होऊन त्यांनी इतरांना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला. कविता व लेख लिहीले. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला. ही प्रेरणा त्यांच्यापासून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख प्रशासन राबविताना महिला विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचे ते म्हणाले. या अनुषंगाने मध्यमवर्गीय घरात मुलींना शिकवण्याची अनास्था लक्षात घेऊन महानगरपालिका मुलींच्या दर्जेदार शिक्षणासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात महिला व बालिका विकासाचे आणखी आदर्शवत काम केले जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान राज्य प्रकल्प संचालक श्रीम.आर विमला यांनी विशेष व्याख्यात्या म्हणून उपस्थित महिलांशी संवाद साधताना सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा क्रांतीकारक बदल घडविणारी स्त्रीशक्ती म्हणून गौरव केला. शिक्षणामुळे स्त्री स्वाभिमानी होते. तिने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची सर्वसमावेशक वृत्ती जोपासली पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्त्रियांनी आपल्या कुटूंबियांची साथ मिळवावी म्हणजे प्रगतीला गती येते असे त्या म्हणाल्या. सावित्रीबाईंना महात्मा फुले यांची साथ लाभली. पुरुषांनी महात्मा फुले यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे व तिच्या क्षमतांना संपूर्ण संधी दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. स्त्री ही परिवर्तनाची वाहक असल्याचे सावित्रीबाईंनी स्वकृतीतून दाखवून दिले त्यामुळे आपण स्वत:ला पणती समजून एकमेकींना ज्योत देत प्रकाशित करीत राहिले पाहिजे असे मत श्रीम.आर विमला यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी महिलांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांनी समाजविकास विभागामार्फत महिला व बालकल्याणपर 25 विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देत त्याचा लाभ मोठया प्रमाणावर घेतला जात असल्याची योजनानिहाय माहिती दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित आठ प्रकारच्या कलागुणदर्शन स्पर्धांमध्ये महिलांनी मोठया संख्येने उत्साही सहभाग घेतला त्यांबद्दल त्यांनी महिलांचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला संस्थेला दिला जाणारा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ घणसोली येथील ‘आरीन फाऊंडेशन’ या संस्थेस सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 21 हजार रक्कमेसह प्रदान करण्यात आला.

महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धंकांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविले गेले. इतर विजेत्या स्पर्धकांचाही सन्मान करण्यात आला.

योगासन स्पर्धा – वयोगट 16 ते 30 वर्ष – कविता नोर (प्रथम क्रमांक)

योगासन स्पर्धा – वयोगट 31 ते 50 वर्ष – माधुरी माने (प्रथम क्रमांक)

योगासन स्पर्धा – वयोगट 51 व पुढील – रंजना भोर (प्रथम क्रमांक)नृत्य स्पर्धा – वयोगट 18 ते 30 वर्ष – वैशाली शेवाळे (प्रथम क्रमांक)नृत्य स्पर्धा – वयोगट 31 ते 40 वर्ष – निलम शिंदे (प्रथम क्रमांक)

नृत्य स्पर्धा – वयोगट 41 व पुढे – तन्वी हिंदळेकर (प्रथम क्रमांक)गायन स्पर्धा – वर्षा लोकरे (प्रथम क्रमांक)निबंध स्पर्धा – सुवर्णा मिसाळ (प्रथम क्रमांक)पाककला स्पर्धा – ज्योती जोशी (प्रथम क्रमांक)सॅलेड सजावट स्पर्धा – सारिका जेधे (प्रथम क्रमांक) टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धा – वनिता परब (प्रथम क्रमांक)रांगोळी स्पर्धा – (प्रथम क्रमांक) – बेलापूर विभाग – रिना मोरे

  नेरुळ विभाग – नयना पाटील,  वाशी विभाग – सुजाता इरशेट्टी,   तुर्भे विभाग – निलम ठाकूर  कोपरखैरणे विभाग – सारिका जेधे ,  घणसोली विभाग – रुपाली पाटील,ऐरोली विभाग – राणी खुणे    दिघा विभाग – दिपीका सोनावणे  या कार्यक्रमाप्रसंगी महिलांच्या उत्साही गर्दीत विष्णुदास भावे नाटयगृह हाऊसफुल्ल होते.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त..

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

vishwatmaklokswamivarta

विभागातर्फे खरीप हंगामाकरिता रासायनिक खत व भात बियाणांचे नियोजन..