vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’… हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’… हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई प्रतिनिधी-

सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृह येथे चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग ही खरोखरच हिमालया एवढी बाब आहे. पस्तीस वर्ष सलगपणे मनोज जोशी हे चाणक्यांची भूमिका करत आहेत. लोकांपर्यंत आर्य चाणक्य यांचे काम ते पोहोचवत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जोशी यांनी नाटक आणि चित्रपटातून दर्जेदार अभिनय केला. चाणक्य नाटकाच्या प्रयोगातून एक प्रकारे त्यांची आराधना त्यांनी केली. एक प्रकारे राष्ट्रीय कार्यच श्री. जोशी यांनी केले. आर्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शक. त्यामुळे जोपर्यंत आपल्या पिढ्या हे विचार अंगिकारत राहील, तोपर्यंत या देशाला, येथील संस्कृती, परंपरेला धोका नाही, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील तापमानात वाढ उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक ‘टेक वारी’चा ऑनलाईन शुभारंभ

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी….