vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..

 

राज्य प्रतिनिधी-

-आसाराम बापूला मोठा दिलासा देत, सर्वोच्च न्यायालयाने त्याला 2013 च्या बलात्कार प्रकरणात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर केला. अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आसाराम बापू पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आपल्या अनुयायांना भेटणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव स्वयंघोषित संत आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नुकतेच 17 दिवसांचा पॅरोल संपल्यानंतर आसाराम बापू सहा दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात परतले होते.

आसाराम बापूच्या जोधपूर आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट 2013 मध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जोधपूर येथील विशेष एससी/एसटी न्यायालयाने आसाराम बापूला लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवले होते. 31 ऑगस्ट 2013 पासून तो तुरुंगात आहे. आसाराम बापूवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते.

संबंधित पोस्ट

रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नागरीक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय..

vishwatmaklokswamivarta

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम जनजातीय गौरव दिवसनिमित्त तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी