vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,  : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सरकारने ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित कुटुंबांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेली योजना आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

ग्रामीण महाराष्ट्रासाठी वीज ही केवळ मूलभूत गरज नाही, तर एक विकासाची संधी आहे. “सूर्यघर मोफत वीज योजना” ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ, नवीकरणीय आणि दीर्घकालीन उपाय असल्यामुळे ही योजना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महावितरण’कडून विविध माध्यमातून योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणा-या ग्राहकांना सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य केले जात आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांना प्रति किलोवॅट 30 हजार याप्रमाणे प्रथम दोन किलो वॅटसाठी 60 हजार आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी 18 हजार असे एकुण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते.

संबंधित पोस्ट

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न