vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळठळक बातम्याप्रदेश

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून..

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होईल.

 पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या www.public.mlwb.in यासंकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभाग व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

  महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांच्या पुरुष संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, तर महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली असेल. तिनही गटातील अंतिम विजेत्या संघाना प्रत्येकी ५० हजार रुपये, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी ३५ हजार रुपये, अंतिम उपांत्य उपविजेता संघाना प्रत्येकी २० हजार रुपये बक्षिसे दिली जातील. तसेच विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. मुंबई व ठाणे वगळता बाहेरगावाहून येणाऱ्या संघांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रतिदिन ४ हजार रुपये दिले जातील. महिलांच्या मुंबई व ठाणे येथील संघांना प्रतिदिन १ हजार रुपये प्रवास खर्चासाठी दिले जातील. पुरुष संघासाठी ३००रुपये आणि महिला संघासाठी २०० रुपये प्रवेश शुल्क असेल.

प्रवेशिका प्रवेश शुल्कासह हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई येथे स्विकारल्या जातील. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व भारतीय कबड्डी संघटनेच्या नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचाअनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; सिरोंचात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवदान

vishwatmaklokswamivarta