vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

  राज्य प्रतिनिधी-जालना, : मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटना वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी 11.00 वाजता संभाजी महाराज पुतळा मोतीबाग जालना ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना व अंबड चौफुली येथील हॉटेल शिवनेरी पर्यंत न्याय महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदर ठिकाणी पोहचल्यानंतर मोर्चेचे रुपांतर सभेमध्ये होणार आहे. सदर मोर्चा व सभेच्या वेळी मोर्चास अडथळा निर्माण होवू नये. रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, या दृष्टीने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल खालील प्रमाणे जालना शहरातील वाहतुक नमुद पर्यायी मार्गान कळविण्याचे आदेश पारीत केले आहेत.

     शुक्रवार, दि. 10 जानेवारी 2025 रोजी सध्याचा प्रचलित मार्ग – NH-753 अंबड चौफुली जालना- मोतीबाग – छत्रपती संभाजीनगर जालना पर्यायी मार्ग- बीड, अंबड, मंठा कडुन येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुक ही मंठा चौफुली- नाव्हा चौफुली देऊळगांव राजा चौफुली- कन्हैयानगर चौफुली भोकरदन चौफुली ग्रेडर टि पॉइंट मार्गे छ. संभाजीनगरकडे जाईल व येईल.

वरील आदेश दिनांक 10 जानेवारी,2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपासुन मराठा क्रांती मोर्चा व सभा संपेपर्यत अंमलात राहील.असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहे.

     -*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

vishwatmaklokswamivarta

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे  मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम

नागपूर स्पोर्ट्स हब” विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta