vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

           जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

 संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 22 जानेवारी 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुरजींचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ – राज्यपाल जिष्णु देव वर्मा नवी मुंबईत ‘श्री गुरु तेग बहादुरजी यांचा वारसा’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा

लातूरच्या उदगीरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न; उदगीर ग्रामीण पोलिसांकडून १३ आरोपींना अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट-गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा…