vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

 

नागपूर, प्रतिनिधी-

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम,मेयो आणि मेडिकलची प्रगतीपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच येथील वीजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस सौर ऊर्जेवर असावा. सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीमधील प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना ही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.मेयो आणि मेडिकल येथे सुरू असलेल्या कामांचा एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस सांगितले.0000

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा #महसूलविभाग.

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस