vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वैश्य समाज स्नेहमेळाव्यात-दिली पर्यटन योजनांची सविस्तर माहिती

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वैश्य समाज स्नेहमेळाव्यात-दिली पर्यटन योजनांची सविस्तर माहिती

 

ठाणे, प्रतिनिधी:- वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे (प.) येथे वैश्य समाज बांधवांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन यशस्वी उद्योगपती श्री.विवेक माणगावकर, उपसंचालक पर्यटन, पर्यटन संचालनालय कोकण विभाग, नवी मुंबई श्री.हनुमंत हेडे, श्री.भाई कामरेकर, श्री.अशोक नर, वैश्य ग्लोबल बिसनेस ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संतोष कामेरकर, उपाध्यक्ष श्री.दिएक मेजारी, सचिव सौ.रुपाली तेलवणे व इतर मान्यवरांच्या उपस्तितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमात वैश्य ग्लोबल बिसनेस ग्रुपने 2025 स्मरणिका प्रकाशन केले ज्या मध्ये प्रादेशिक उपक्रम आणि यशस्वी उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे.

या कार्यक्रमात श्री.हनुमंत हेडे यांनी पर्यटन धोरण 2024, कृषी पर्यटन धोरण, आई योजना आणि इतर पर्यटन योजनांची सविस्तर माहिती उपस्थित उद्योजकांना देवून पर्यटन क्षेत्रात नवीन पर्यटन प्रकल्प उभे करण्याचे आवाहन केले.

वैश्य ग्लोबल ग्रुपने वैश्य समाजाचे उद्योजक वैश्य ग्लोबल ग्रुपने वैश्य समाजातील उद्योजक व्यावसायिकांची एकता असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी भाषणे, उद्योग वाढविण्यासाठी “नेटवर्किंग सत्र”, मार्गदर्शन सत्र, इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते, ज्यात महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंचित झाली. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि स्वादिष्ट जेवणाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या सोहळ्याला खासदार श्री.नरेश म्हस्के, माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.दीपक केसरकर, श्री. अध्धती भालेराव, सौ. कीर्ती गावडे इत्यादींनी या सोहळ्यास भेट देऊन उपस्थित उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. असे कार्यक्रम सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात, आणि पर्यटन संचालनालयांतर्गत महाराष्ट्राच्या विविधतेला आणि एकतेला बळ देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन उपयुक्त ठरते.00000

संबंधित पोस्ट

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी वेगवान समनव्यन’सचेत’ प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती,२४ ते २६ मे दरम्यानच्या अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप