vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

 

 राज्य प्रतिनिधी-बुलढाणा,) : जिल्हाधिकारी कार्यालय,बुलढाणा मार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना ई महसूल प्रणाली अंतर्गत ऑनलाईन सेवांच्या विविध ई प्रणालीचे एकत्रित क्यूआर कोड (QR code) उपलब्ध केले आहेत. हे क्यूआर कोड शेतकरी, नागरिकांनी मोबाइल फोनद्वारे स्कॅन करून लिंकवर क्लिक करावे आणि ई महसूल प्रणालीअंतर्गत सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

या ई-महसूल प्रणालीमधील ई हक्क, ई चावडी नागरिक पोर्टल, ई रेकॉर्डस, ई नकाशा, भुलेख, ई फेरफार या ॲानलाईन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ई हक्क प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरील ईकरार नोंद, बोजा कमी करणे, बोजा नोंद घेणे,गहाणखत, मयत कुळ वारस, नाव कमी करणे,7/12 दुरुस्तीची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. ई चावडी पोर्टलद्वारे जमीन महसूल कर पावती पाहता येते. ई रेकॉर्ड्स प्रणालीद्वारे जुना सातबारा, फेरफार, पेरेपत्रक पाहता येतात. ई नकाशा प्रणालीद्वारे शेत जमिनीचा नकाशा पाहता येतो. भुलेख प्रणालीद्वारे ॲानलाईन सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८ अ उतारा पाहता येतो. आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्डच्या क्यूआर कोडद्वारे फेरफार नोटीस, मोजणी नोटीस पाहता येते. याशिवाय डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८अ उतारा डाऊनलोडसुद्धा करता येणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे सर्व शासन निर्णय पाहता येतील.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांसाठी या डिजिटल ई महसूल प्रणाली सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,सर्व तहसीलदार कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ई-प्रणाली सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे. ०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!*वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!नाटकाचे नाव बदलून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचे सेन्सर बोर्डाचे निर्मात्यांना स्पष्ट निर्देश*

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न*

vishwatmaklokswamivarta

शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित समता दिंडी, चित्ररथ उत्साहात संपन्न

पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’ आयोजन

vishwatmaklokswamivarta