vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई…

 

राज्य प्रतिनिधी-मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने २८ डिसेंबर २०२४ रोजी मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

28 डिसेंबरला मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते.स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा धनादेश आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री. टिपरी यांना प्रदान करण्यात आला.

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -“WAVES 2025”माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा..ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta