vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट विक्रमी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट-विक्रमी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज…

 

राज्य प्रतिनिधी दावोस, – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

यंदाच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्यालाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला.

दावोस येथे साकारलेल्या इंडियन पॅव्हेलियनच्या उद्घाटन समारंभाला सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या स्वागत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम मध्यरात्रीनंतर होईल.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालकसुद्धा आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबतसुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

संबंधित पोस्ट

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे -राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणारआदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

स्वामित्व योजनेअंतर्गत आज (दि.१८)सनद वितरण कार्यक्रम; थेट प्रसारण पाहता येणार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta