vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

 

राज्य व्यावसायिक प्रतिनिधी जालना, :- महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’) पुणे आणिमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,जालना संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी एका उमेदवाराला याप्रमाणे मोफत आयात- निर्यातीवर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन दि. 27 जानेवारी 2025 रोजी करण्यात येत आहे. तालुका निहाय व्यक्ती यांना आयात- निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी, आयात निर्यात प्रक्रिया काय आहे यासंबंधी तज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक विनोद तुपे व कार्यक्रम समन्वयक वैशाली कुलकर्णी (७३५०४१८४९२), यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना येथे अथवा दुरध्वनी क्र. ०२४८२-२२०५९२ वर संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

महाराजस्व अभियानातून शासकीय योजना लोकांच्या दारात – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके कोरपना येथे आयोजन ; लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta