vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

 

मुंबई प्रतिनिधी-प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शायरी, गझल आणि सूफी संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, अल्पसंख्याक विकास विभागाचे आणि उर्दू साहित्य अकादमीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळाली. गझल गायक सिराज अहमद खान यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांच्या कडकडाटासह “वाह! क्या बात है!” असे शब्द ऐकू येत होते

.शायर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. कमर सुरूर फारूकी, नैम फराज, सदानंद बेंद्रे, अभिजित सिंग, वालिद जमाद, शौखत अली, तारीख जमाल, नईम फराझ यांनी आपल्या शायरीने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कासिम इमाम यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत अनिवार्य

vishwatmaklokswamivarta