vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठी भाषा पंधरवडा:जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम

मराठी भाषा पंधरवडा:जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम

 

बुलढाणा, प्रतिनिधी : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात आले आहे. यासह ‘ग्रंथदान’ हा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे.

हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन भूसंपादन इमारतीमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमींनी लाभ घ्यावा. तसेच ‘ग्रंथदान’ उपक्रमात सहभागी होवून कमीत कमी एक पुस्तक इतर वाचकांसाठी दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.

दानरूपी पुस्तके दि.२८ जानेवारी रोजी पुस्तक प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या ठिकाणी नवीन भूसंपादन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे. 000000000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप:

अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.