vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

बुलढाणा, प्रतिनिधी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 3 ते 7 फेब्रुवारी 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हेस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्ती करणार आहे.

 प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान ५ वी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी दि. 5 फेबुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालया जवळ, चिखली रोड, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय त्यांना ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे. 000000

संबंधित पोस्ट

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे — डॉ. भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…