vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा कारागृहातील विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जिल्हा कारागृहातील विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त निधीतून बुलढाणा जिल्हा कारागृह येथे विविध विकास कामे सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व अपर जिल्हाधिकारी शेलार यांनी कारागृहास भेट दिली.

भेटी दरम्यान बंद्याकरीता सुरु करण्यात आलेले नवीन मुलाखत कक्ष, बांधकाम सुरु असलेले व्हि.सी.कक्ष, पाकगृह, दोन प्रार्थना भवन येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली. त्यानंतर सर्कल विभागातील बॅरकची पाहणी करुन बंद्यांशी संवाद साधला. तसेच कारागृहाव्दारे बंद्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यामध्ये बंद्यांना त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधणे, व्हिडीओ कॉलीग सुविधा, ॲलन व्हिडीओ सुविधा, ग्रंथालय, विधीसहाय्य, अल्पमुदतीचे विविध प्रशिक्षण तसेच शेती व वृक्षलागवडी याचा समावेश होता.

जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान कारागृहातील बंद्यांनी विविध सांस्कृतीक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहात राबविण्यात येऊ शकणाऱ्या योजना व कारागृहातील बंदी कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांच्या पुर्नवसानसाठी बंद्यांनी व कारागृह प्रशासनाने करावयाची उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन प्राप्त नवीन रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचेमार्फत पुजन करुन नवीन रुग्णावाहिका कारागृहास प्रदान करण्यात आली.

सदर कार्यक्रमा प्रसंगी कारागृह अधीक्षक संदिप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम देशमुख तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000000

संबंधित पोस्ट

सकाळ माध्यम समूहातर्फे पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषद शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक ‘टेक वारी’चा ऑनलाईन शुभारंभ

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना आज ६ जुलै रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.