vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

 

सातारा प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सातारा कार्यालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय बालिका दिनाची शपथ घेतली.

या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एन. एन. बेदरकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.

  जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दर्शनी कार्यालय, सातारा येथे राष्ट्रीय बालिका दिन उपस्थित पक्षकार, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी यांचे समवेत शपथ घेवून साजरा करणेत आला व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्फत जनजागृती करण्याच्या हेतूने उपस्थित विधिज्ञ यांनी पक्षकार व नागरिकांना मार्गदर्शन केले व न्यायालयीन कर्मचवाऱ्यांनी त्या संबंधातील प्रसिध्दी पत्रके उपस्थित पक्षकारांना वाटप केले. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एन. एन. बेदरकर यांनीयावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाचीही शपथ दिली.

0000

लोकशाही दिनाचे 3 फेब्रुवारी रोजी आयोजन

सातारा प्रतिनिधी फेब्रुवारी 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान येथे भूखंडाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर