vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

 

बुलडाणा, प्रतिनिधी: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राव्दारे दि. 26 जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध स्पर्धेत सहभागी विजेता खेडाळूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.

  स्पर्धेच्या सुरुवातीला बुलढाणा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. 100 मी धावणे स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक किशोर बरेडे, व्दितीय क्रमांक सचिन घोती, तृतीय क्रमांक संकेत वायाळ तर मुलींमध्ये प्रथम जान्हवी खरात, व्दितीय क्रमांक नेहा जाधव, तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी वारंगाणे यांनी पटकविला. गोळाफेक या खेळात मुलांमध्ये प्रथम क्रमांक सागर पाटील, व्दितीय क्रमांक सागर बोर्डे, तृतीय क्रमांक तिलक तोंडीलायता यांनी तर मुलींमध्ये प्रथम नेहा जाधव, व्दितीय क्रमांक वैष्णवी निकाळजे, तृतीय क्रमांक मिरा टेकाळे यांनी पटकविला. खो-खो या खेळात प्रथम क्रमांक ऑफिनिटी युथ क्लब पाडळी, व्दितीय क्रमांक- शिवसाई क्लब बुलढाणा तर तृतीय क्रमांक जिजामाता क्लब बुलढाणा यांनी पटकविला. कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जय मातृभूमी मंडळ, बुलढाणा, ‍व्दितीय क्रमांक जय हनुमान मंडळ साखळी तर तृतीय क्रमांक जय मॉ शेरावाली संघ तारापूर यांनी पटकविला.

   तालुकास्तरीय स्पर्धेनंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आले. यामध्ये 100 मी धावणे स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक सचिन घोती, व्दितीय क्रमांक किशोर बरडे, तृतीय क्रमांक गौरव वाडेकर तर मुलींमध्ये प्रथम जान्हवी खरात, व्दितीय क्रमांक गौरी राठोड, तृतीय क्रमांक नेहा जाधव यांनी पटकविला. गोळाफेक या खेळात मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोहीत इंगळे, व्दितीय क्रमांक- शिवानंद केकन, तृतीय क्रमांक सागर पाटील यांनी तर मुलींमध्ये प्रथम नेहा जाधव, व्दितीय क्रमांक निता बामणे, तृतीय क्रमांक- वैष्णवी निकाळजे यांनी पटकविला. खो-खो या खेळात प्रथम क्रमांक श्री शिवाजी क्लब चिखली, व्दितीय क्रमांक भिंगारा ता.जळगांव जामोद, तर तृतीय क्रमांक ऑफिनिटी युथ क्लब पाडळी यांनी पटकविला. कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जय मातृभूमी मंडळ, बुलढाणा, ‍ व्दितीय क्रमांक दत्त क्रीडा मंडळ जळगांव जामोद, तर तृतीय क्रमांक रेणुका क्रीडा मंडळ मोहदरी ता. चिखली यांनी पटकविला. सर्व विजयी स्पर्धकांना ट्राफी, मेडल्स व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

 स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, युथवेल संचालक राजेश शेळके, ॲथेलेटीक कोच विजय वानखडे, कैलास करवंदे, धनंजय चाफेकर, निलेश पवार हे उपस्थितीत होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता आकाश चाफेकर, सुहास राऊत आदींनी परिश्रम घेतले.00000

संबंधित पोस्ट

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta