vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित..

 

मुंबई प्रतिनिधी
-नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले.आपल्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कॉर्पोरेट समूह, सार्वजनिक उपक्रम, उद्योग, सामाजिक संस्था व समाजसेवी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नवभारत- नवराष्ट्र तेजोत्सव या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला नवभारतचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा सिंह, अध्यक्ष, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज तसेच निमंत्रित उपस्थित होते.
यावेळी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन नवाथे, सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालिका सारा तेंडुलकर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांसह एल अँड टी, टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ डी वाय पाटील शिक्षण समूह, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, रायन इंटरनॅशनल, ग्रांट मेडिकल फाउंडेशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटकमंडळ क्षेत्रात मिळणार नागरीसुविधांचा लाभ

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.      

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार