vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

 रायगड, प्रतिनिधी:- रायगड जिल्ह्यात सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कुटुंबनिवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय,रायगड वृषाली माकर यांनी केले आहे.

भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि ‘मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

 त्याअनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचेआयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि.07 जानेवारी 2025 ते 10 जानेवारी 2025 याकालावधीमध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्षभेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करतील. नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील.००००००

संबंधित पोस्ट

कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासण्या

vishwatmaklokswamivarta

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गडांचा राजा : राजगड

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

vishwatmaklokswamivarta