vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

९ फेब्रुवारी – उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस निश्चयाचा महामेरू..बहुत जनांसी आधारु..

 ९ फेब्रुवारी – उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस निश्चयाचा महामेरू..बहुत जनांसी आधारु..

 

विशेष लेख-

राज्य प्रतिनिधी -भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना-राज्यकर्त्यांना आपल्या वाडवडीलांचा- पूर्वजांचा राजकीय वारसा लाभला.त्यामुळे ते सहजपणे सत्तास्थानी विराजमान झालेत.मात्र शिवरायांच्या सातारचा एकनाथ हे त्याला अपवाद आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वावर शून्यातून विश्व निर्माण केलं.त्यांचा नगरसेवक ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हा यशस्वी राजकीय प्रवास नवोदित युवा नेत्यांसाठी पथदर्शक आहे.खरं तर,हीच त्यांच्या यशस्वी राजकीय प्रवासाची यशगाथा होय. मित्रहो,अनाथांचे नाथ – एकनाथ या सातारच्या सुपुत्रानं शिवछत्रपतींच्या कर्मभूमीची माती ललाटी लावून काही तरी करून दाखवावं या उद्देशाने ठाणे या सांस्कृतिक नगरीत पदार्पण केलं अन् बघता..बघता त्यांच्या जीवनास मोठी कलाटणी मिळाली.या शाश्वत घटनेला समस्त ठाणेकर साक्षीदार आहेत.

एकनाथजी यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी वंदनीय गंगूबाईआईसाहेब यांच्या उदरी झाला,अन् जणू गोरगरीब,कष्टकरी लोकांचा आश्रयदाता उदयास आला.भाईंच्या वडिलांचे नाव संभाजीराव तर,महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळगाव.शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल,परखड अन् ओजस्वी वाणीनं प्रेरित होऊन,तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या भगव्या विचाराच्याशिकवणीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आणि बघता-बघता त्यांचं राजकीय-सामाजिक- आध्यात्मिक जीवन हिंदुत्वमय झालं.

परंतु दुर्दैवानं एक काळा दिवस उजाडला.अन् २००१ मध्ये दिघेसाहेबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू होऊन ठाणेकरांवर दुःखाची अवकळा पसरली.संपूर्ण ठाणे शहर सुन्न झालं.प्रत्येकाला आपल्या घरातील थोरली व्यक्ती गेल्याचे दुःख झालं.त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी शिंदेसाहेबांना सोपविली.ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदाचं उत्तरदायित्व यांच्या हाती आलं.गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पूर्णक्षमतेचे चालवत,सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने एकनाथजी राजकारणातून समाजकारण करत आहेत,म्हणजे हीच खरी स्व.दिघेसाहेबांना मानवंदना होय.म्हणतात ना,” हर कामियाब इंसान के पीछे औरत का हाथ होता है” हे विधान शिंदेसाहेबांच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे.शिंदेसाहेबांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे ह्या सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात.इतकेच नव्हे तर,सुख-दुःखाच्या वाटेकरीही राहिल्या. सौ.लताताई ह्या खऱ्या अर्थानेशिंदेसाहेबांच्या सावली आहेत.आपला सुपुत्र श्रीकांत यास डॉक्टर बनविण्याचं स्वप्न लताताईंनी खरं करून दाखविलं.यास्तव सौ.लताताईंना त्रिवार मानाचा मुजरा!

आपल्या गुरुवर्यांचा आदर्श घेत शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र-बेळगाव सीमा आंदोलनात अग्रेसर राहून बेल्लारी तुरुंगात ४ महिने कारावास भोगला.त्यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी असलेले गांभीर्य पाहून त्यांची पुढे समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.याशिवाय लोकांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी जनआंदोलनांचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक गुन्हे आपल्या अंगावर घेतले.जिल्हा प्रमुख म्हणून विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देत,त्यांनी ठाणे जिल्ह्यात व आसपासच्या क्षेत्रात शिवसेनेचा गड कायमस्वरुपी राखला आहे. संवेदनशीलता,संयम,साहस,निष्ठा अन् संघर्ष हे गुण अंगीकारुन त्यांनी आपलं राजकीय विश्व निर्माण केलं.आम्ही ठाणे जिल्ह्यातले सर्वधर्मीय लोक खरोखर भाग्यवान आहोत की,ज्यांना शिंदेसाहेबसारखा लोकहितवादी नेता मिळाला.

कोरोना महामारीमुळे सारं जग मोठ्या संकटात सापडले असता,नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी ठोस उपाययोजना करून ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोरोनाला नियंत्रित करण्यात यश मिळविलं.कोरोना काळातील भाईंनी केलेली रुग्णसेवेची कामे राज्यातील सर्वधर्मीय लोकांच्या आजही स्मरणात आहेत.सुरुवातीच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या,कारण या महामारीवर कोणतीही लस वा औषध जगात उपलब्ध नव्हती.शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन या द्वय सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वधर्मीय लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.तसेच कोरोनाविषयक जनजागृती करून लोकांना राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केलं.त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगून स्वतःची व आपापल्या कुटुंबांची काळजी घेतली.आतापर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केल्याने लाखों लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.त्यामुळे कोरोना काळात लोकांच्या आरोग्याचे खऱ्या अर्थाने रक्षण झाले.या महत्वपूर्ण कार्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटेसर,कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत व

सहप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे आणि मदत कक्षाच्या टीमचे मोठे योगदान लाभले असून, रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद कृतीनं खरं करून दाखविलं,याचा आम्हा तमाम शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.

राज्यातील लोकांचे आरोग्याचे रक्षण करण्याबरोबरच त्यांना पंचतारांकित दळणवळणच्या पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात देखील शिंदेसाहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) म्हणून पूर्णक्षमतेने कृतिशील राहिले.राज्यातील रस्त्यांचा विकास,त्यांचं बांधकाम अन् देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यरत आहे.

एवढं करून भाई थांबले नाहीत.मुंबई-सिंधुदुर्ग असा रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती चा महामार्ग तयार होत असून,त्यामुळे कोंकण विभागातील औद्योगिक व पर्यटन विकासासह दळणवळणाची सोयही गतिमान होताहे.या व्यतिरिक्त ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीला जाणारा रस्ता ; शीळ- कल्याण रुंदीकरण ; ठाणे घोडबंदर उन्नत रस्ता ; वडाळा-घाटकोपर ठाणे मेट्रो ; ठाणे शहरअंतर्गत मेट्रो प्रकल्प ; कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक ;ठाण्यातील कोपरी पुल ;वांद्रे-वर्सावा सी लिंक प्रकल्प ; मुंबई पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल महामार्ग प्रकल्प आदी तत्सम पब्लिक प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे राज्यभरातील दळणवळण प्रक्रिया गतिमान होईल,ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.वास्तवात नागरी जीवन अधिक सुखकर,विना अडथळ्याचं,कमी खर्चाचं,वेळ वाचविणारं आणि समृद्ध करण्याकडे शिंदेसाहेबांचा मानस असल्याचे निष्पन्न होते.

समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने व्हावी,या उद्देशाने अधिक लक्ष घातले आहे.यावर सुमारे ५५ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.त्यामुळे १० जिल्हे,२६,तालुके अन् ३९३ खेडींची दळणवळणाची मोठी सोय झाली आहे.हा प्रोजेक्ट राज्यातील लोकांना वरदान ठरला आहे.त्यामुळे अवघ्या ८ तासात मुंबई-नागपूर अंतर पार करता येत आहे.त्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.वास्तवात हीच खरी ना.एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीतील विकासगाथा होय.

शिंदे सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी निर्णय म्हणजे स्त्रियांना वयाची अट न ठेवता,एस टी बसने अर्ध्या तिकीटावर प्रवास सवलत आणि ७५ वर्षांवरील वृद्धांना एस.टी.प्रवास मोफत करण्याची मुभा दिल्याने त्यांना तीर्थयात्रा करणं सुकर झालं आहे.त्याची परिणिती म्हणजे स्त्रिया अन् वृद्धमंडळीची एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे.यास्तव विविध संघटना/सेवाभावी संस्थांनी शिंदेसाहेबांचे शतश:आभार मानले आहेत.ठाणे शहरातील धोकादायक अन् मोडकळीस आलेल्या इमारतींतल्या लोकांचे जीवन सुरक्षित करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी नगर विकास मंत्री या नात्याने त्यांच्या प्रयत्नांतून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी सिडको व ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो लढा दिला,त्याची ही फलश्रुती आहे,असे विधान शिंदेसाहेबांनी याप्रसंगी केले.या महत्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ८ ते १० लाख ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळून,त्याचे नवे व सुंदर घर मिळण्याचे स्वप्न साकार होईल,हे निश्चित.”आमदार झाल्यानंतर २००४ साला पासून मी सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी अविश्रांत प्रयत्न करत आहे” अशी स्पष्टोक्ती

शिंदेसाहेबांनी यावेळी बोलताना केली.शिंदेपिता-पुत्राने लोकोपयोगी कामांच्या व संघटन कौशल्याच्या जोरावर अनुक्रमे विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला.ना.शिंदेसाहेबांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून सलग ५ वेळा तर,डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपली राजकीय योग्यता सिद्ध केली.

गेल्या अडीचवर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ना.एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ५१,०००हून अधिक गोरगरीब,निर्धन,गरजू लोकांच्या महागड्या शस्त्रक्रियेंसाठी ३१७ कोटीहून अधिक अर्थसहाय्य अदा केलं,ही अद्वितीय व अतुलनीय गोष्ट असून,आरोग्य क्षेत्रात एक विक्रम प्रस्थापित केला आहे,असे अभिमानाने म्हणावे लागेल.याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाअंतर्गत राज्यात ७०० दवाखाने सुरू करण्याचा शिंदेसाहेबांचा मानस आहे.ठाणे-मुंबई जिल्ह्यात आज शेकडो आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत.त्याचाआजमितीपर्यंत लाखों लोकांनी लाभ घेतला आहे.महात्मा ज्योतिराव फुलेजनआरोग्य योजनेअंतर्गत असंख्य गोरगरीब लोकांना महागडे ऑपरेशन करण्यासअर्थसहाय्य प्राप्त झालं आहे.आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे.त्यामुळे गरजू रुग्णांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील गोरगरीब,निर्धन लोकांच्या सुमारे ५,६०० हून अधिक महान मुला-मुलींच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याचे सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफतशस्त्रक्रिया करून दिल्या आहेत.त्यामुळे ती मुलं आता निरोगी जीवनाचा श्वास घेत सुदृढ जीवन जगत आहेत.याशिवाय कोरोना काळात रुग्णांची ने-आण करणं सुकर व्हावं,या उद्देशाने डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने राज्यात सुमारे ३०० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.खऱ्या अर्थाने ही आरोग्य क्षेत्रातली क्रांतीच म्हणावी.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,आरोग्यदूत फाउंडेशन तथा रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या षष्ठ्यब्धि निमित्त राज्यात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरा केलं जात आहे.अत: यावर्षादरम्यान ६०० लहान मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया;६०० दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप;६० महाआरोग्य शिबिराचे आयोजन;६० हजार नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी; ६० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप; ६० हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; ६० हजार किलोमीटरची आरोग्य संपदा यात्रा; ६० हजार वृक्षांची लागवड आणि ६० हजार रक्तपिशवींचे संकलन संकल्प हे उपक्रम राबविले जात आहेत.

ना.एकनाथजी शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत ऐन विधानसभा निवडणुकींच्या आधी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवून आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली.गत लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. त्याचा वचपा काढत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकींमध्ये प्रचंड विजय संपादन करून महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.या अभूतपूर्व विजयश्रीचे श्रेय

सर्वस्वी शिंदेसाहेबांना जाते.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वधर्मीय महिलांना माहे १५०० रुपये अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला.सदर अर्थसहाय्याच्या मदतीने राज्यातल्या माता-भगिनी छोटाखानी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.राज्यातील सुमारे १ कोटी ६० लाख गोरगरीब,गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.यास्तव भगिनींनी शिंदेसाहेबांना भाऊरायाची उपमा देऊन त्यांचे मन:पूर्वक आभार मानत,त्यांना बहिणीच्या नात्याने भरभरून राख्या बांधल्या.यालाच खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण करणं म्हणतात.राज्यातील गोरगरीब,गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे  घरकुल,शिक्षण,रोजगार-स्वयंरोजगार,आरोग्य हे मूलभूत प्रश्न शिंदेसाहेबांनी मार्गी लावले आहेत,ही कौतुकास्पद गोष्ट आहे.त्याचप्रमाणे बळीराजाच्या कृषी वीजपंपाचे बिलं माफ करण्यात आली आहेत.अतिवृष्टी अन् गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य देण्यात आले आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून वारकरी मंडळांना प्रत्येकी 20 हजार रुपयेअर्थसहाय्य देण्यात सुरुवात झाली आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थ यात्रा करण्यास जाण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल वारकरी संस्थांकडून शिंदेसाहेबांचे मनस्वी आभार ! उपमुख्यमंत्री

माननीय एकनाथजी शिंदे यांना समस्त वारकरी संस्थांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणास आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,ही आई जगदंबे चरणी प्रार्थना!💐🎂🙏

जय 🇮🇳हिंद ! जय🚩महाराष्ट्र!

लेखक – रणवीर राजपूत

गवर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन(निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी)(मो.न.९९२०६७४२१९)

…………………………………………

संपादक -: चंद्रशेखर स्वामी विश्वात्मक लोकस्वामी वार्ता, डेली वेब पोर्टल न्यूज आणि मासिक पत्रिका*****

🙏🙏🙏🙏🙏

संबंधित पोस्ट

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी..

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न – स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित- जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे