vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षिसे जाहीर

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षिसे जाहीर

 

मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात 5 मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे जानेवारी- 2025 मध्ये 3 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष (भव्यतम), 7 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र सह्याद्री, 11 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गौरव, 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व 25 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी 4.00 वाजता काढण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम सोडत तिकीट क्रमांक NY-07/3054 या चिराग एन्टरप्राइजेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रुपये 25 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच महा.सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रुपये 7 लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 8 बक्षिसे जाहीर झाली आहेत. जानेवारी 2025 मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून 16227 तिकिटांना रुपये 81,51,050/- व साप्ताहिक सोडतीतून 57501 तिकिटांना रुपये 2,20,10,900/- बक्षिसे जाहीर झाली आहेत.

 सर्व खरेदीदारांना महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु.10,000/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या कार्यालयाकडे तसेच रक्कम रुपये 10,000/- या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्याबाबत आवाहन उपसंचालक, महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी केले आहे.000

संबंधित पोस्ट

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*